1. हेरोद राजाच्या दिवसांत यहूदीयांतील बेथलहेमांत येशू जन्मल्यानंतर, पाहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारुं लागले कीं
2. यहूद्यांचा राजा जन्मला तो कोठ आहे? कारण आम्हीं पूर्व देशेस तारा पाहून त्याला नमन करावयास आला आहा.
3. ह ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरुशलेम घाबरलीं;
4. आणि त्यान लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यांस जमवून विचारिल कीं, खिस्ताचा जन्म कोठ व्हावा?
5. ते त्याला म्हणाले, यहूदीयांतील बेथेलहेमांत; कारण संदेश्ट्यांच्या द्वार अस लिहिल आहेः
6. हे बेथलहेमा, यहूदाच्या प्रांता, तूं यहूदाच्या सर्व सरदारांमध्य कनिश्ठ आहेस अस मुळींच नाहीं; कारण माझ्या इस्त्राएल लोकांस पाळील असा सरदार तुझ्यांतून निघेल.
7. तेव्हां हेरोदान मागी लोकांस गुप्तपण बोलावून त्यांपासून तारा दिसत असल्याचा काळ नीट विचारुन घेतला,
8. आणि त्यांस बेथलहेमास पाठवितांना म्हटल, तुम्ही जाऊन त्या बाळकाविशयीं बारकाईनें षोध करा; व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीहि येऊन त्याला नमन करीन.
9. राजाच ह बोलण ऐकून ते निघाले, आणि पाहा, जो तारा त्यांनीं पूर्वदिशेस पाहिला होता तो, जेथ बाळक होता, त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्यापुढ चालला.
10. तो तारा पाहून त्यांस अतिशय आनंद झाला.
11. घरांत जाऊन त्यांनीं बाळकास त्याची आई मरीया इच्याजवळ पाहिल, पायां पडून त्याला नमन केल, आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोन, ऊद व गंधरस हीं दान त्याला अर्पिली.
12. मग हेरोदाकडे परत जाऊं नये अशी त्यांस स्वप्नांत सूचना झाल्यामुळ, ते दुस-या मार्गान स्वदेशास गेले.
13. ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला, ऊठ, बाळक व त्याची आई यांस घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला तेथून जाण्यास सांगेन तोपर्यंत तेथ ऐस; कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे.
14. मग तो उठून बाळक व त्याची आई यांस रात्रीं घेऊन मिसर देशांस निघून गेला;
15. आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथ राहिला; ‘मी आपल्या पुत्राला मिसर देशांतून बोलाविल आहे,’ अस ज प्रभून संदेश्ट्याच्या द्वार सांगितल होत त पूर्ण व्हाव म्हणून अस झाल.
16. तेव्हां मागी लोकांनीं आपणाला फसविल ह पाहून हेरोद अतिशय रागावला, अािण जो काळ त्यान मागी लोकांपासून नीट विचारुन घेतला होता त्या काळाप्रमाण त्यान बेथलहेमांत व त्याच्या सर्व सीमांत जे दोन वर्शाचे व त्यांहून कमी वयाचे बाळक होते त्या सर्वांस माणस पाठवून त्यांजकडून जिवंे मारविल.
17. रामा येथ रडण व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यांत आला, राहेल आपल्या मुलांकरितां रडत आहे, आणि तीं नाहींत म्हणून ती सांत्वन पावेना, अस ज यिर्मया संदेश्ट्याच्या द्वार सांगितल होत त त्या समयीं पूर्ण झाल.
19. पुढ हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशांत योसेफास स्वप्नांत दर्शन देऊन म्हणाला,
20. ऊठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्त्राएलाच्या देशांत जा, कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहत होते ते मेले आहेत.
21. तेव्हां तो उठून बाळक व त्याची आई यांस घेऊन इस्त्राएलाच्या देशांत आला;
22. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागीं यहूदीयांत राज्य करीत आहे, ह ऐकून तो तेथ जाण्यास भ्याला; आणि स्वप्नांत सूचना झाल्यामुळ तो गालील प्रांतांत निघून गेला,
23. व नासरेथ नांवाच्या गांवीं जाऊन राहिला; यासाठीं कीं ‘त्याला नासोरी म्हणतील’ ह ज संदेश्ट्यांच्या द्वार सांगितल होत त पूर्ण व्हाव.
|