1. येशू पुनः त्यांस दाखले देऊन बोलूं लागलाः
2. स्वर्गाच राज्य कोणाएका राजासारिख आहे; त्यान आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली;
3. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांस आमंत्रण दिल होत त्यांस बोलावण्याकरितां त्यान आपले दास पाठविले, परंतु ते येईनात.
4. पुनः त्यानें दुसरे दास पाठविले, व त्यांस म्हटल कीं आमंत्रितांस अस सांगा, पाहा, मीं जेवण तयार केल आहे, आपले बैल व पुश्ट कापिले आहेत, सर्व सिद्ध आहे, लग्नाच्या मेजवानीस चला.
5. तरी ह कांहीं मनावर न घेतां ते कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाराला गेले;
6. आणि वरकडांनीं त्याच्या दासांस धरुन गांजिल व जिव मारिल.
7. तेव्हां राजाला राग आला; आणि त्यान आपलीं सैन्य पाठवून त्या घातक्यांचा नाश केला, व त्यांच नगर जाळून टाकिल.
8. मग तो आपल्या दासांस म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतुु आमंत्रित योग्य नव्हते,
9. म्हणून तुम्ही चवाठ्यांवर जाऊन जितके तुम्हांस आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलावा.
10. मग त्या दासांनीं रस्त्यांवर जाऊन बरेवाईट जितके त्यांस मिळाले त्या सर्वांस एकत्र केल; आणि लग्नाच्या जेवणा-यांची भरती झाली.
11. राजा जेवणा-यांना पाहावयास आंत आला, तेव्हां लग्नाचा पोशाक न घातलेला असा एक मनुश्य त्याच्या दृश्टीस पडला.
12. त्याला तो म्हणाला, मित्रा, तूं लग्नाचा पोशाक घातल्यावांचून येथ कां आलास? त्यान कांहीं उत्तर केल नाहीं.
13. मग राजान चाकरांस सांगितल, याच हातपाय बांधून याला बाहेरील अंधारांत टाका, तेथ रडण व दांतखाण चालेल.
14. बोलाविलेले बहुत आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.
15. नंतर परुश्यांनीं जाऊन त्याला बोलण्यामध्य पाशांत कस पाडाव यासंबंधान मसलत केली.
16. त्यांनीं आपल्या शिश्यांस हेराद्यांसह त्याजकडे पाठवून म्हटल, गुरुजी, आम्हांस ठाऊक आहे कीं आपण खर आहां, देवाचा मार्ग खरेपणान सांगतां, व कोणाची भीड धरीत नाहीं; कारण आपण ताड पाहून बोलत नाहीं.
17. आपणाला कस वाटत ह आम्हांस सांगा. कैसराला कर देण ह योग्य आहे किंवा नाहीं?
18. येशू त्यांच दुश्टपण ओळखून म्हणाला, अहो ढाग्याना, माझी परीक्षा कां पाहतां?
19. कराच नाण मला दाखवा; तेव्हां त्यानंी त्याच्याजवळ एक पावली आणिली.
20. त्यान त्यांस म्हटल, हा मुखवटा व हा लेख कोणाचा?
21. ते म्हणाले, कैसराचा; त्यान त्यांस म्हटल, तर मग कैसराच त कैसराला, आणि देवाच त देवाला भरुन द्या.
22. ह ऐकून त्यांना आश्चर्य वाटल, व ते त्याला सोडून गेले.
23. त्याच दिवशीं, पुनरुत्थान होत नाहीं, अस म्हणणा-या सदूक्यांनीं त्याच्याकडे येऊन त्याला विचारिल.
24. गुरुजी, मोशान सांगितल आह कीं ‘जर कोणीएक संतान नसतां मेला तर त्याच्या भावान त्याच्या स्त्रीबरोबर विवाह करुन आपल्या भावाचा वंश चालवावा.’
25. आम्हांमध्य सात भाऊ होते; त्यांतला पहिला लग्न करुन मेला आणि त्याला संतति नसल्यामुळ त्याची बायको त्याच्या भावाची झाली.
26. याप्रमाण दुसरा, तिसरा, असे सातहि जण लग्न करुन मेले;
27. आणि सर्वांमागून ती स्त्री मेली.
28. तर पुनरुत्थानसमयीं ती त्या सात जणांतून कोणाची बायको होईल? कारण ती त्या सर्वांची झाली होतीं.
29. येशून त्यांस उत्तर दिलः तुम्हांस शास्त्र व देवाच सामर्थ्य न कळल्यामुळ तुम्ही भ्रमांत पडलां आहां.
30. कारण पुनरुत्थानांत लग्न करुन घेत नाहींत व लग्न करुन देतहि नाहींत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाण असतात.
31. मृतांच्या पुनरुत्थानाविशयी देवान तुम्हांस सांगितल त तुमच्या वाचण्यांत आल नाहीं काय?
32. त अस कीं, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आह.’ देव मृतांचा नव्हे, जीवंताचा आहे.
33. ह ऐकून लोकसमुदांस त्याच्या शिक्षणाच आश्चर्य वाटल.
34. त्यान सदूकी यांस कुंठित केल अस ऐकून परुशी एकत्र जमले;
35. आणि त्यांतील एका शास्न्न्यान त्याची परीक्षा पाहण्याकरितां विचारलः
36. गुरुजी, नियमशास्त्रांतील कोणती आज्ञा मोठी आहे?
37. तो त्याला म्हणाला, ‘तूं आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणान, पूर्ण जिवान व पूर्ण मनान प्रीति कर;’
38. हीच मोठीं व पहिली आज्ञा आहे.
39. हिच्यासारखी दुसरी एक ही आहे की ‘तूं आपल्या शेजा-यावर आपणासारखी प्रीति कर.’
40. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदिश्टशास्त्र हीं अवलंबून आहेत.
41. परुशी एकत्र जमले असतां येशून त्यांस विचारिलः
42. खिस्ताविशयीं तुम्हांस काय वाटत? तो कोणाचा पुत्र आहे? ते त्याला म्हणाले, दाविदाचा.
43. त्यान त्यांस म्हटल, तर मग दाविदान आत्म्याच्या प्रेरणेन त्याला प्रभु अस कस म्हटल? तो म्हणतो,
44. परमेश्वरान माझ्या प्रभूला सांगितल, मी तुझ्या शत्रूंस तुझ्या पायाखालीं घालीपर्यंत तूं माझ्या उजवीकडे बैस.
45. दावीद जर त्याला प्रभु म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा होईल?
46. तेव्हां कोणाला त्यास उत्तर देतां येईना; आणि त्या दिवसापासून त्याला आणखी कांहीं विचारावयास कोणीहि धजला नाहीं.
|