1. मनुश्यांनीं पाहाव या हेतून तुम्ही आपल धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविशयीं जपा; केल तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांस प्रतिफळ नाहीं.
2. यास्तव तूं धर्म करितोस तेव्हां मनुश्यांनीं आपली कीर्ति वर्णावी म्हणून ढागी जसे सभास्थानांत व रस्त्यांत आपणांपुढ करणा वाजवितात, तस करुं नको. मी तुम्हांस खचीत सांगता कीं त्यांस आपल प्रतिफळ भरुन मिळाल आहे.
3. तूं तर धर्म करितोस तेव्हां तुझा उजवा हात काय करिता ह तुझ्या डाव्या हाताला कळूं नये;
4. यासाठीं कीं तुझ धर्म करण गुप्तपण व्हाव, म्हणून तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.
5. तसच तुम्ही प्रार्थना करितां तेव्हां ढाग्यांसारिखे होऊं नका; कारण मनुश्यांनीं आपणांस पाहाव म्हणून सभास्थानांत व चवाठ्यांवर उभे राहून प्रार्थना करण त्यांस आवडत. मी तुम्हांस खचीत सांगता कीं ते आपल प्रतिफळ भरुन पावले आहेत.
6. तूं तर प्रार्थना करितोस तेव्हां ‘आपल्या खोलींत जा, व दार लावून’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.
7. तुम्ही प्रार्थना करितां तेव्हां विदेश्यांसारखी व्यर्थ बडबड करुं नका; आपल्या बहुभाशणामुळं आपल मागणे मान्य होईल अस त्यांस वाटत.
8. तुम्ही त्यांच्यासारिख होऊं नका, कारण तुम्हांस ज कांहीं अवश्य आहे त तुम्हीं मागण्यापूर्वी तुमच्या पित्याला कळत.
9. यास्तव या प्रकार प्रार्थना कराः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझ नाम पवित्र मानिल जावो.
10. तुझ राज्य येवो, जस स्वर्गात तस पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाण होवो.
11. आमची रोजची भाकर आज आम्हांस दे;
12. आणि जस आम्हीं आपल्या ऋण्यांस ऋण सोडिल आहे तशीं तूं आमची ऋण आम्हांस सोड;
13. आणि आम्हांस परीक्षत आणूं नको; तर आम्हांस वाइटापासून सोडीव. (कारण कीं राज्य, सामर्थ्य आणि गौरव हीं सर्वकाळ तुझीं आहेत; आमेन.)
14. जर तुम्ही मनुश्यांच्या अपराधांची क्षमा करितां तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांस क्षमा करील;
15. परंतु जर तुम्ही मनुश्यांच्या अपराधांची क्षमा करीत नाहीं, तर तुमचा पिता तुमच्या आपराधांची क्षमा करणार नाहीं.
16. तुम्ही उपास करितां तेव्हां ढाग्यासारिख म्लानमुख होऊं नका, कारण आपणांस उपास आहे अस मनुश्यांस दिसाव म्हणून ते आपले ताड विरुप करितात. मी तुम्हांस खचीत सांगता कीं त आपल प्रतिफळ भरुन पावले आहेत.
17. तूं तर उपास करितोस तेव्हां आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले ताड धू;
18. यासाठीं कीं तूं उपास करितोस ह मनुश्यांस दिसाव म्हणून नव्हे, तर तुझा गुप्तवासी पिता याला दिसाव, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल.
19. पृथ्वीवर आपणांकरितां संपत्ति साठवूं नका; तेथ कसर व जंग खाऊन नाश करितात, व चोर घर फोडून चोरी करितात;
20. तर स्वर्गात आपणांकरितां संपत्ति सांठवा; तेथ कसर व जंग खाऊन नाश करीत नाहींत, व चोर घर फोडून चोरी करीत नाहींत;
21. कारण जेथ तुमची संपत्ति आहे तेथ तुमच चित्तहि असणार.
22. डोळा शरीराचा दिवा आहे; यास्तव तुझा डोळा निर्दोश असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;
23. पण तुझा डोळा सदोश असला तर तुझ संपूर्ण शरीर अंधकारमय होईल; यास्तव तुझ्यांतील प्रकाश अंधार असला तर तो अंधार केवढा!
24. कोणाच्यान दोन धन्यांची चाकरी करवत नाहीं, कारण तो एकाचा द्वेश करील व दुस-यावर प्रीति करील; अथवा एकाशीं निश्ठेन वागेल व दुस-याला तुच्छ मानील. तुमच्यान देवाची आणि धनाचीहि सेवा करवत नाहीं.
25. यास्तव मीं तुम्हांस सांगता कीं आपल्या जीवाविशयीं, म्हणजे आपण काय खाव व काय प्याव; आणि आपल्या शरीराविशयीं, म्हणजे आपण काय पांघराव; अशी काळजी करुं नका. अन्नापेक्षां जीव व वस्त्रापेक्षां शरीर विशेश आहे कीं नाहीं?
26. आकाशांतील पाखर लक्षपूर्वक पाहा; तीं पेरीत नाहींत, कापीत नाहींत, व कोठारांत सांठवीत नाहींत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांस खावयास देतो; तुम्ही त्यांपेक्षां श्रेश्ठ आहां कीं नाहीं?
27. काळजी करुन अपल्या आयुश्याची दोरी हातभार वाढवावयास तुम्हांतील कोण समर्थ आहे?
28. तसच वस्त्राविशयीं कां काळजी करितां? रानांतील भूकमळ कशीं वाढतात ह लक्षांत आणा; तीं कश्ट करीत नाहींत व कांतीत नाहींत;
29. तरी मी तुम्हांस सांगतो कीं शलमोन देखील आपल्या सर्व वैभवांत त्यांतल्या एकासारिखा सजला नव्हता.
30. ज रानांतल गवत आज आहे व उद्यां भट्टीत पडत त्याला जर देव असा पोशाख घालतो, तर, अहो अल्पविश्वासी, तो विशेशकरुन तुम्हांस पोशाख घालणार नाहीं काय?
31. यास्तव काय खाव, काय प्याव, काय पांघराव, अस म्हणत काळजी करीत बसूं नका.
32. कारण ही सर्व मिळवावयास विदेशी लोक खटपट करितात; या सर्वांची गरज तुम्हांस आहे ह तुमच्या स्वर्गीय पित्यास ठाऊक आहे.
33. तर तुम्ही प्रथम त्याच राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे यांबरोबर तींहि सर्व तुम्हांस मिळतील.
34. यास्तव उद्याची काळजी करुं नका, कारण उद्याचीं काळजी उद्यां; ज्या दिवसाच दुःख त्या दिवसाला पुरे.
|