1. नंतर मीं मंदिरांतून निघालेली एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांस म्हणालीः जा, देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या पृथ्वीवर ओता.
2. तेव्हां पहिल्यान जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतिली; ता त्या श्वापदाची खूण धारण केलेले आणि त्याच्या मूर्तीला नमन करणारे लोक यांवर वाईट व दुश्ट रोगाची धाड पडली.
3. दुस-यान आपली वाटी समुद्रांत ओतिलीं; तेव्हां ‘तो’ मृताच्या रक्तासारखा ‘रक्तमय झाला’ आणि समुद्रांतील सर्व जीवसृश्टि नश्ट झाली.
4. तिस-यान आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे यांत ओतिलीं; ‘ता तीं रक्तमय झालीं’
5. तेव्हां मी जलांच्या देवदूताला अस बोलतांना ऐकलः ‘जो तूं आहेस’ व होतास, ‘जो तूं पवित्र’ त्या तूु असा न्यायविाडा केला म्हणून तूं ‘न्यायवान्’ आहेस;
6. यांनी पवित्र जनांचे व संदेश्ट्यांचे ‘रक्त पाडिल’ आणि तूं ‘त्यांस रक्त प्यावयास’ लाविल आहे; ह्यास ते पात्र आहेत.
7. नंतर मीं वेदीला अस बोलतांना ऐकलः हो, ‘हे सर्वसत्ताधारी प्रभु देवा, तुझे न्याय सत्य’ व ‘नीतीचे’ आहेत.
8. चवथ्यान आपली वाटी सूर्यावर ओतिली; त्याकडे अग्नीच्या योग मनुश्यांना करपवून टाकण्याच सोपविल होत.
9. मनुश्य कडक उन्हान करपून गेलीं; तेव्हां त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नामाची निंदा त्यांनी केली आणि देवाच गौरव करण्यासाठी पश्चाताप करावा तो त्यांनी केला नाहींं.
10. पांचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतिली; ता त्याच राज्य अंधकारमय’ झाल, आणि लोकांनी दुःखामुळ आपल्या जिभा चाविल्या;
11. आपल्या वेदनांमुळे व आपल्या व्रणांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली, आणि आपल्या कर्मांचा पश्चाताप केला नाहीं.
12. सहाव्यान आपली वाटी फरात महानदावर ओतिली; ता सूर्याच्या उगवतीपासून येणा-या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिच पाणी आटून गेल.
13. नंतर मीं ‘बेडकांसारखे’ तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या ताडांतून, श्वापदाच्या ताडांतून व खोट्या संदश्ेट्यांच्या ताडांतून निघतांना पाहिल.
14. त चिन्ह करणारे भूतांचे आत्मे आहेत; त संपूर्ण जगांतील राजांस ‘सर्वसत्ताधारी देवाच्या’ त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकत्र करावयास त्यांजकडे बाहेर जातात.
15. (पाहा, मी चोरासारखा येता. आपण नग्न अस चालूं नये व आपली लाज लोकांस दिसूं नय म्हणून जो जागृत राहतो व आपलीं वस्त्र राखितो तो धन्य.)
16. त्यांनी त्यांस इब्री भाशेत ‘हर्मगिदोन’ म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केल.
17. सातव्यान आपली वाटी अंतराळांत ओतिली; ता मोठी ‘वाणी मंदिरांतून,’ राजासनापासून निघाली; ती म्हणाली, झाल;
18. तेव्हां ‘विजा, ध्वनि व गर्जना’ झाल्या; शिवाय मोठा भूमिकंप झाला, तो इतका की ‘पृथ्वीवर’ मनुश्य ‘झाल्यापासून’ इतका मोठा ‘कधी झाला नव्हता.’
19. मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राश्ट्रांची नगर कोसळली आणि त्यान ‘आपल्या’ ‘तीव्र क्रोधाच्या द्राक्षारसाचा प्याला’ तिला द्यावा, म्हणून देवासमोर ‘मोठ्या बाबेल’ नगरीच स्मरण करण्यांत आल.
20. सर्व बेट पळून गेलीं, आणि डागरांचा थांग नाहींसा झाला.
21. सुमार एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशांतून मनुश्यांवर पडल्या; तेव्हां गारांच्या पीडेमुळ लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्या गारांची पीडा ‘पराकाश्ठेची’ होती.
|