1. नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकीं एक जण येऊन मजबरोबर बोलूं ंलागला; तो म्हणाला, इकडे ये, म्हणजे ‘बहुत जलांवर’ बसलेली मोठी कळवंतीण हिचा झालंेला न्यायनिवाडा तुला दाखविता;
2. ‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरुपी ‘द्राक्षारसान पृथ्वीवर’ राहणारे जण ‘मस्त झाले.’
3. मग मी आत्म्यान संचारलेला असतांना त्यान मला रानांत नेल; ता देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या, सात डोकीं व दहा शिंगे असलेल्या किरमिजी रंगाच्या ‘श्वापदावर’ बसलेली एक स्त्री दृश्टीस पडली.
4. ती स्त्री जांभळी व किरमिजी वस्त्र ल्यालेली, आणि सोन, मूल्यवान् रत्न व मोत्य यांनी शृंगारलेली होती. तिच्या हातांत अमंगळ पदार्थांनी म्हणजे तिच्या जारकर्मांच्या मळाने भरलेला ‘सोन्याचा प्याला’ होता;
5. तिच्या कपाळावर ‘मोठी बाबेल, कळवंतिणीची’ व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई, ह गूढार्थक नांव लिहिलेल होत.
6. तीं स्त्री पवित्र जनांच्या रक्तान व येशूच्या साक्ष्यांच्या रक्तानंे मस्त झालेली माझ्या दृश्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्चर्य वाटल.
7. देवदूतान मला म्हटल, तुला आश्चर्य कां वाटल? ती स्त्री आणि सात डोकीं व दहा शिंग असलेल तिला वाहून नेणार श्वापद यांचे गूज मी तुला सांगता.
8. ज ‘श्वापद’ तूु पाहिल त होत आणि नाहीं; त ‘अगाधकूपांतून वर येणार’ आहे व नाशांत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्यांचे नांव ‘जीवनी पुस्तकांत लिहिल’ नाहीं असे पृथ्वीवर राहणारे जन, त श्वापद होत, नाही व येणार अस पाहून आश्चर्य करितील.
9. ह ज्ञानी मनाच काम आहे. तीं सांत डोकीं सात डागर आहेत; त्यांवर ंती स्त्री बसली आहे;
10. आणि तीं डोकीं सात राजे आहेत, त्यापैकीं पांच पडले आहेत, एक आहे आणि एक अद्याप आला नाहीं; तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावे लागेल.
11. ज श्वापद होत आणि नाही त स्वतः आठवा राजा आह; तो त्या सातांपासून झाालेला आहे; आणि तो नाशांत जाणार आहे.
12. जीं ‘दहा शिंगे’ तूं पाहिली ‘तीं दहा राजे आहेत,’ त्यांस अद्यापि राज्य मिळाल नाहीं; तरी त्यांस श्वापदाबरोबर तासभर राजांच्या सारखा अधिकार मिळतो.
13. ते एकविचाराचे आहेत आणि ते आपल सांमर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात.
14. हे कोक-याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांस जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभु आणि राजांचा राजा’ आहे; आणि पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याजबरोबर आहेत तेहि विजय मिळवितील.
15. आणखी तो मला म्हणाला, जेथ कळवंतीण बसली आहे, तेथ जीं जल तूं पाहिलीं ती लोक, जनसमूह, राश्टेª, भाशा अशीं आहेत.
16. जीं दहा शिंगे व जे श्वापद तूं पाहिल ती कळवंतिणीचा द्वेश करितील व तिला ओसाड व नग्न करितील, तिच मांस खातील व अग्नीन तिला जाळून टाकितील.
17. त्यांनी एकविचारान वागून देवाची वचन पूर्ण होत तोपर्यंत आपले राज्य श्वापदाला द्याव अशा इराद्यान कृति करण्याच देवान त्यांच्या मनांत घातल.
18. जी स्त्री तूं पाहिली ती ‘पृथ्वीवरच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी आहे.
|