1. त्यानंतर मीं दुस-या एका देवदूताला स्वर्गांतून उतरतांना पाहिल, त्याला मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजान पृथ्वी प्रकाशित झाली.
2. तो मोठ्या उच्च वाणीन म्हणाला, ‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भूतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व आगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.
3. कारण, ‘तिच्या’ जारकर्माचा क्रोधरुपी ‘द्राक्षारस सर्व राश्टेª प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केल व पृथ्वीवरील व्यापारी तिच्या विशयभोगास लाविलेल्या द्रव्यबळान बनवान् झाले.
4. मग स्वर्गांतून निघालेली दुसरी एक वाणी मीं ऐकली; ती म्हणालीः ‘माझ्या लोकांनो,’ तुम्हीं तिच्या पापांचे वांटेकरी होऊं नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊं नये म्हणून ‘तिच्यांतून निघा.’
5. कारण तिच्या ‘पापांचा ढीग स्वर्गांतून पोहंचला’ आहे; आणि तिच्या अर्धमाची आठवण देवान केेली आहे.
6. ‘जस तिन दिल तस तिला द्या, तिच्या कर्माप्रमाण’ तिला दुप्पट द्या; तिन प्याल्यांत जितक ओतिल त्याच्या दुप्पट तुम्ही त्यांत ओता.
7. ज्या मानान तिन आपल गौरव केल व विशयभोग घेतला, त्या मानान तिला पीडा व दुःख द्या; कारण ती ‘आपल्या मनांत म्हणते, मी राणी होऊन बसल्य आह; मीं कांही विधवी नाहीं; मी दुःख पाहणार देखील नाही.’
8. यामुळ तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुश्काळ ‘एका दिवशींच येतील,’ आणि ती अग्निन जाळून टाकिली जाईल; कारण ज्यान तिचा ‘न्यायनिवाडा केला’ तो ‘प्रभु’ देव ‘सामर्थ्यवान्’ आहे.
9. पृथ्वीवरील ज्या राजांनी तिच्याबरोबर ‘जारकर्म’ व विलास ‘केला’ ते तिच्या पीडेच्या भयामुळ दूर उभे राहून तिच्या जळण्याचा धूर पाहतील तेव्हां तिजकरितां ‘रडतील व ऊर बडवून घेतील;’ ते म्हणतील, अनर्थ ! अनर्थ ! बाबेल ही मोठी नगरी होती ! ही बळकट नगरी होती! एका क्षणांत तुला न्यायदंड प्राप्त झाला आहे.
11. पृथ्वीवरील ‘व्यापारी’ तिजसाठी ‘रडतात व शोक करितात;’ कारण त्यांचा माल आतां कोणी विकत घेत नाहीं;
12. सोन, रुप, मोलवान् रत्न, मोत्य, तागाच तलम कापड, जांभळîा रंगाचे कापड, रेषमी कापड, किरमिजी रंगाचें कापड, सर्व प्रकारच सुगंधी काश्ठ, सर्व प्रकारचीं हस्तिदंती पात्र, सर्व प्रकारचीं अति मोलवान् काश्ठाचीं, पितळेची, लोखंडाचीं व संगमरवरी पाशाणाचीं पात्र;
13. दालचिनी, सुगंधी उटणीं, धूपद्रव्य, सुगंधी तेल, ऊद, द्राक्षारस, जैतुनाच तेल, सपीठ, गहूं, गुर, मढर, घोडे, रथ, दास व ‘मनुश्यांचे जीव’ हा त्यांचा माल कोणी घेत नाहीं.
14. ज्या फळफळावळीची तुझ्या जिवाला चटक लागली आहे ती तुजपासून गेली आहे; आणि मिश्टान्न्ा व विलासाचे पदार्थ हे सर्व तुजपासून नाहींतसे झाल आहेत; ते पुढ कोणाला मिळणारच नाहींत.
15. तिच्यायोगान धनवान् झालेले त्या पदार्थांचे ‘व्यापारी’ ‘रडत व शोक करीत’ तिच्या पीडेच्या भयामुळ दूर उभे राहतील;
16. आणि म्हणतीलः अनर्थ ! अनर्थ ! पाहा ही मोठी नगरी ! तागाचीं बारीक वस्त्र, जांभळीं व किरमिजी वस्त्र पांघरलेली, सोन, मोलवान् रत्न व मोत्य यांनी शृंगारलेली नगरी !
17. एका क्षणांत ह्या इतक्या संपत्तीची ओसाडी झाली. सर्व ‘नाखादे,’ गलबतांवरुन बंदरोबंदरी जाणारे सर्व, आणि ‘खलाशी व समुद्रावर’ निर्वाह करणारे सर्व दूर ‘उभे राहिले;’
18. आणि तिच्या जळण्याचा धूर पाहून आक्रोश करीत म्हणालेः या मोठ्या नगरी ‘सारखी कोणती’ नगरी आहे?
19. त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली आणि रडत, शोक करीत व आक्रोश करीत, म्हटलः अनर्थ ! अनर्थ ! जिच्या ‘संपत्तीन समुद्रांत’ गलबत बाळगणारे सर्व ‘श्रीमंत झाले’ ती मोठी नगरी ! गेली, गेली ! ती एका क्षणांत ‘ओसाड झाली.’
20. हे स्वर्गा, अहो पवित्र जनांनो, प्रेशितांनो व संदश्ट्यांनो, तिजविशयी ‘आनंद करा; कारण, देवान तिला दंड करुन तुमचा ‘न्यायनिवाडा केला आहे.’
21. नंतर एका बलवान् देवदूतान जात्याच्या मोठ्या तळीसारखा ‘धोंडा’ उचलिला ‘आणि’ तो समुद्रांत ‘टाकितांना म्हटलः अशीच’ ती ‘मोठी नगरी बाबेल’ झपाट्यान टाकिली जाईल ‘व फिरुन’ सांपडणारच नाहीं;
22. वीणाकरी, ‘गवई, पांवा वाजविणारे व करणेकरी’ यांचा ‘शब्द’ तुझ्यांत सांपडणारच नाहीं; ‘आणि जात्याचा शब्द’ तुझ्यांत ‘यापुढ ऐकूं येणारच नाहीं; कोणत्याही कारागिरीचा कोणताहि कारागीर तुझ्यांत सांपडणारच नाहीं; ‘आणि जात्याचा षब्द’ तुझ्यांत यापुढ ऐकूं येणारच नाहीं;
23. ‘दिव्याचा उजड’ तुझ्यांत यापुढ दिसणारच नाहीं; आणि ‘नव-याचा व नवरीचा’ शब्द तुझ्यांत यापुढ ऐकूं येणारच नाही; तुझे व्यापारी पृथ्वीवरील थोर थोर होते; आणि सर्व राश्टª ‘तुझ्या चेटकान’ ठकविली गेलीं.
24. तिच्यामध्य संदेश्ट्ययांच, पवित्र जनांचे व ‘पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे’ रक्त सांपडल.
|