1. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जषी काय एक मोठी वाणी मीं ऐकली; ती म्हणाली: ‘हालेलूया;’ तारण, गौरव व सामर्थ्य हीं आमच्या देवाचीं आहेत;
2. कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्य व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कळवंतणीनें आपल्या जारकर्मानें पृथ्वी भ्रश्ट केली तिचा न्यायनिवाडा त्यानें केला आहे, आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.’
3. ते पुनः म्हणाले, ‘हालेलूया; तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.’
4. तेव्हां ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमस्कार घालितांना म्हणाले: आमेन; ‘हालेलूया.’
5. इतक्यांत ‘राजासनापासून’ मोठी वाणी झाली; ती म्हणाली: अहो त्याची भीति बाळगणा-या सर्व लहानथोर जनांनो, अहो त्याच्या दासांनो, आमच्या देवाचें स्तवन करा.
6. तेव्हां जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहांची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मीं ऐकली; ती म्हणाली: हालेलूया; कारण ‘सर्वसत्ताधारी’ आमचा ‘प्रभु देव’ यानें ‘राज्य हातीं घेतलें आहे.’
7. ‘आपण आनंद’ व ‘उल्हास करुं’ व त्याचें गौरव करुं; कारण कोक-याचें लग्न आलें आहे, आणि त्याच्या नवरीनें स्वतःला सजविलें आहें,
8. तिला तेजस्वी व षुद्ध असें तागाचें तलम वस्त्र परिधान करावयाला दिलें आहे; तें तागाचें तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्यें आहेत.
9. तेव्हां तो मला म्हणाला; हें लिही कीं कोक-याच्या लग्नाच्या मेेजवानीस बोलाविलेले ते धन्य. तो मला असेंहि म्हणाला; हीं देवाचीं सत्य वचनें आहेत.
10. तेव्हां मी त्याच्या पायां पडून नमस्कार घालणार होतों; परंतु तो मला म्हणाला; असें करुं नयें; मी तुझा आणि जे येषूविशयींची साक्ष पटवितात त्या तुझ्या बंधूंचा सोबतीचा दास आहें; नमस्कार देवाला घाल; येषूविशयींची साक्ष संदेषाचें मर्म आहे.
11. ‘नंतर मीं स्वर्ग उघडलेला पाहिला;’ तों पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याजवर बसलेला एक स्वार माझ्या दृश्टीस पडला; ‘तो नीतीनें न्यायनिवाडा करितो’ व लढाई चालवितो.
12. ‘त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे’ व त्याच्या डोक्यावर पुश्कळ मुगूट होते; त्यावर एक नांव लिहिलेलें होतें; तें त्याजवांचून कोणाला कळत नाहीं.
13. रक्तांत बुचकळलेलें वस्त्र त्यानें अंगावर घेतलें होतें; आणि देवाचा षब्द हें नांव त्याला देण्यांत आलें होतें.
14. स्वर्गातील सैन्यें पांढ-या घोड्यांवर बसून पांढरीं व षुद्ध अषीं तागाचीं तलम वस्त्रें अंगावर घालून त्याच्यामागें चालत होतीं.
15. त्यानें ‘राश्ट्रांस मारावें’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून’ तीक्ष्ण धारेची तरवार निघते; तो ‘त्यांवर लोखंडी दंडानें राज्य करील;’ आणि ‘सर्वसत्ताधारी देव याच्या’ तीव्र क्रोधाच्या द्राक्षारसाचें ‘कुंड तो तुडवितो.’
16. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हें नांव लिहिलेलें आहे: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभु.
17. नंतर मीं एका देवदूतास सूर्यांत उभें राहिलेलें पाहिलें; तो अंतराळांतील मध्यभागीं उडणा-या सर्व पांखरांस उच्च वाणीनें म्हणाला: ‘या,’ देवाच्या मोठ्या जेवणावळीस एकत्र व्हा;
18. ‘राजांचें’ मांस, सरदारांचें ‘मांस, ‘बळवानांचे मांस, घोड्यांचें’ व त्यांवरील स्वारांचें ‘मांस, आणि स्वतंत्र व दास, लहानमोठे अषा सर्वांचें मांस’ ‘खावयास’ या.
19. तेव्हां तें श्वापद, ‘पृथ्वीवरील राजे’ व त्यांची सैन्यें ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास ‘एकत्र झालेली’ मीं पाहिलीं.
20. मग श्वापद धरिलें गेलें आणि त्याबरोबर खोटा संदेश्टाहि धरिला गेला; त्यानें श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणा-या लोकांस त्याच्यासमोर चिन्हें करुन ठकविलें होतें. ह्या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरांत जीवंत टाकण्यांत आलें;
21. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडांतून निघालेल्या तरवारीनें मारिले गेले; आणि त्यांच्या मांसानें सर्व पाखरें तृप्त झालीं.
|