1. सार्दीस एथील मंडळीच्या देवदूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत व सात तारे आहेत तो असे म्हणतो: तुझा कृत्ये मला ठाऊक आहेत; तू जीवंत आहेस असें तुला नांव आहे, तरी तूं मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे.
2. तू जागृत हो आणि जे मृतवत् होऊन राहिले आहे तें स्थिर कर; कारण तुझी कृत्यें माझ्या देवाच्या दृश्टीनें पूर्ण अशी माझ्या दिसण्यांत आलीं नाहींत.
3. यास्तव तूं कसें घेतले व ऐकले याची आठवण कर; ते राखून ठेव व पश्चाताप कर; कारण तूं जागृत न झालास तर मी चोरासारखा येईन; मी कोणत्या घटकेस तूजवर येईन हें तुला कळणार नाही.
4. तरी ज्यांनी आपली वस्त्रें विटाळविली नाहीत, अशीं थोडकी नांवें सार्दीस एथे तुझ्याजवळ आहेत; ते शुभ्र वस्त्रे परिधान करुन माझ्या बरोबर फिरतील, कारण ते लायक आहेत.
5. जो विजय मिळवितो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रें परिधान केलेला होईल; मी ‘जीवनी पुस्तकांतले’ त्याचें नांव ‘खोडणारच’ नाही, आणि माझ्यापित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचें नांव पत्करुन घेईन.
6. आत्मा मंडळîांस काय म्हणतो हें ज्याला कान आहे तो ऐको.
7. फिल्देलफिया एथील मंडळीच्या देवदूताला लिही: जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडीत नाही,’ तो असे म्हणतोः
8. तुझीं कृत्यें मला ठाऊक आहेत. (पाहा, मी तुजपूढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही); तुला शक्ति थोडी आहे, तरी तूं माझें वचन पाळिले व माझे नाम नाकारिले नाही, हें मला ठाऊक आहे.
9. पाहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहूदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटें बोलतात; त्यापैकीं कांही तुला देईन; पाहा ते यऊन तुझ्या पायांजवळ नमन करितील’ व ‘मी तुजवर प्रीति केली आहे’ हे समजून घेतील; असे मी करीन.
10. तूं माझें धीराचें वचन राखिले आहे म्हणून पृथ्वीवर राहणा-या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षाप्रसंग येणार आहे त्या परीक्षाप्रसंगापासून मीहि तुला राखीन.
11. मी लवकर येतो; कोणी तुझा मुकूट घेऊं नये म्हणून जें तुझें आहे ते दृढ धरुन राहा.
12. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरांतील स्तंभ करीन; तो तेथून कधीं बाहेर जाणारच नाही; त्यावर माझ्या देवाचें नाम, स्वर्गांतून माझ्या देवापासून उतरणारें नवे यरुशलेम, माझ्या देवाचें ‘नगर, याचें नाम;’ आणि माझंे ‘नवें नाम’ लिहीन.
13. आात्मा मंडळîांस काय म्हणतो हें ज्याला कान आहे तो ऐका.
14. लावदिकीया एथील मंडळीच्या देवदूताला लिही; जो आमेन, जो ‘विश्वासू’ व खरा ‘साक्षी,’ जो देवाच्या ‘सृश्टीचें अदिाकारण’ तो असें म्हणतो,
15. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तूं शीत नाहींस व उश्ण नाहींस हें मला ठाऊक आह; तूं शीत किंवा उश्ण असतास तर बरें होतें;
16. पण तूं तसा नाहींस, काबट आहेस; म्हणजे उश्ण नाहींस, शीत नाहींस, म्हणून मीं तुला आपल्या ताडांतून ओकून टाकणार आहें.
17. मी धनवान् आहें, मीं ‘धन मिळविलें आहे,’ व मला कांही उणें नाहीं असें तूं म्हणतोस; पण तूं कश्टी, दीन, दरिद्री व अंधळा व उघडावाघडा आहेस हें तूला कळत नाहीं.
18. ह्याकरितां मी तुला मसलत देतों की, धनवान् व्हावे म्हणून तूं अग्निनें शुध्द केलेलें सोनें मजपासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यांत येऊं नये म्हणून नेसावयास शुभ्र वस्त्रें विकत घे; आणि तुझी दृश्टी यावी म्हणून डोळîांत घालण्यांस अंजन विकत घे.
19. ‘जितक्यांवर मी प्रीति करितों तितक्यांला त्यांचे अपराघ त्यांच्या पदरीं घालून शिक्षा करितों; यास्तव आस्था धर अधि पश्चाताप कर.
20. पाहा, मी दाराजवळ उभा आहें व ठोकीत आहें; जर कोणी माझाी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आंत जाईन व त्याज बरोबर जेवीन, आणि तो मजबरोबर जेवील.
21. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याजवळ बसूं देईन; मीहि तसा विजय मिळवून आपल्या पित्याजवळ त्याच्या राजासनावर बसलों;
22. आात्मा मंडळîांस काय म्हणतो हें ज्याला कान आहे तो ऐका.
|