1. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातावर पाठपोट लिहिलेली व सात शिक्के मारुन बंद केलेली अशी पुस्तकाची गंुडाळी मीं पाहिलीं;
2. आणि पुस्तकाचे शिक्के फोडून त उघडावयास कोण योग्य आहे, अस मोठ्यान ओरडणारा एक बलवान् देवदूत मीं पाहिला.
3. तेव्हां स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखालीं कोणी ह पुस्तक उघडावयास किंवा त्यांत पाहावयास समर्थ नव्हता.
4. ह पुस्तक उघडावयास किंवा त्यांत पहावयास योग्य असा कोणी आढळला नाहीं म्हणून मी फार रडला.
5. तेव्हां वडीलमंडळापैकीं एक जण मला म्हणाला, रडूं नको; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह,’ दाविदाचा ‘अंकुर’ यान जय मिळविला; तो त्याचे सात शिक्के फोडून पुस्तक उघडण्यास योग्य आहे.
6. तेव्हां राजासन व चार प्राणी हीं, आणि वडीलमंडळ ह्यांच्यामध्य, ज्याचा जणूं काय वध करण्यांत आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मीं पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत.
7. त्यान जाऊन ‘राजासनावर जो बसलेला’ होता त्याच्या उजव्या हातांतून त पुस्तक घेतल.
8. त्यान पुस्तक घेतल तेव्हां ते चार प्राणी व चोवीस वडील कोक-याच्या पायां पडले; त्या सगळîा वडीलमंडळाजवळ वीणा व धुपान भरलेली सोन्याची धुपाटणी होती.; तीं पवि. जनांच्या प्रार्थना आहेत.
9. ते ‘नव गीत गातात,’ त अस; तूं पुस्तक घ्यावयास व त्याचे शिक्के फोडावयास योग्य आहेस; कारण तूं वधिला गेला होतास; आणि तूं आपल्या रक्तान सर्व वंश, भाशा, लोक व राश्टª यांतले इसम आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत.
10. आमच्या देवासाठीं त्यांस राज्य व याजक असे केले आहेत; आणि ते पृथ्वीवर राज्य करीत आहेत.
11. तेव्हां मीं पाहिल ता राजासन, प्राणी व वडील यांच्याभांेवतीं बहुत देवदूतांची वाणी ऐकूं आली; आणि त्यांची संख्या ‘अयुतांची अयुत व सहस्त्रांची सहस्त्र होतीं.’
12. ते मोठ्यान म्हणत होतेः वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुति ह्यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे.
13. स्वर्गांत, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खालीं व समुद्रावर जी प्रत्येक वस्तु आहे ती, आणि त्यांतील सर्व यांस मीं अस म्हणतांना ऐकलः ‘राजासनावर बसलेला’ याला व कोक-याला स्तुति, सन्मान, गौरव व सत्ता हीं युगानुयुग असोत.
14. तेव्हां ते चार प्राणी म्हणाले, आमेन; आणि वडील मंडळींनीं पायां पडून नमस्कार केला.
|