1. बंधुजनहो, त्यांच्याविशयीं माझी मनिशा व देवाजवळ विनंति अशी आहे कीं त्यांचे तारण व्हाव.
2. मी त्यांजविशयीं साक्ष देता कीं त्यांस देवाविशयीं आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरुन नाहीं.
3. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळच व ते आपलच नीतिमत्त्व स्थापावयास पाहत असल्यामुळ ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहींत.
4. प्रत्येक विश्वास ठेवणा-याला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठीं खिस्त नियमशास्त्राचीं समाप्ति असा आहे.
5. मोशे अस लिहितो: जो मनुश्य नियमशास्त्राच नीतिमत्त्व आचरितो तो त्यान वांचेल;
6. परंतु विश्वासान ज नीतिमत्त्व त म्हणत: ‘तूं आपल्या मनांत म्हणूं नको कीं उर्ध्वलोकीं कोण चढेल?’ (अर्थात् खिस्ताला खालीं आणावयास)
7. किंवा ‘अधोलोकीं कोण उतरेल? (अर्थात् खिस्ताला मेलेल्यांतून वर आणावयास.)
8. तरे त काय म्हणत? त वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या ताडात व तुझ्या अंतःकरणांत आहे;’ जे विश्वासाच वचन आम्ही गाजविता तच हे आहे;
9. जर तूं आपल्या मुखान येशू प्रभु आहे अस स्वीकारिशील, आणि देवान त्याला मेलेल्यांतून उठविल असा आपल्या अंतःकरणांत विश्वास धरशील तर तुला तारणप्राप्ति होईल;
10. नीतिमत्त्वासाठीं विश्वास धरण अंतःकरणान होत, तारणाचा स्वीकार करण ताडान होत.
11. शास्त्र म्हणत, ‘जो कोणी त्याजवर विश्वास ठेवितो तो फजित होणार नाहीं’
12. यहूदी व हेल्लेणी यांमध्ये भेद नाहीं; कारण सर्वांचा प्रभु एकच असून जे त्याचा धावा करितात त्या सर्वास पुरवठा करण्याइतका तो संपन्न आहे;
13. ‘जो कोणी प्रभूच नाम घेऊन त्याचा धावा करील त्याच तारण होईल.’
14. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेविला नाहीं त्याचा धावा ते कसा करितील? ज्याच ऐकल नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेेवितील? घोशणा करणा-यांवांचून ते कसे ऐकतील?
15. आणि ज्यांना पाठविल नाहीं, ते कशी घोशणा करितील? ‘चांगल्या गोश्टींची सुवार्ता सांगणा-यांचे चरण किती मनोरम दिसतात !’ असा शास्त्रलेख आहे.
16. तथापि सुवार्तेकडे सर्वांनी लक्ष दिल अस नाही. यशया म्हणतो, ‘हे प्रभु आम्हीं ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे?’
17. याप्रमाण विश्वास वार्तेन व वार्ता खिस्ताच्या वचनान होते;
18. पण मी विचारिता, त्यांनीं ऐकल नव्हत काय? हो, ऐकल होत; त्यांचा नाद सर्व पृथ्वीभर, व त्यांचे शब्द दिगंतरीं पाचले.
19. आणखी मी विचारितो कीं इस्त्राएलाला कळल नव्हत काय? प्रथम मोशेे म्हणतो, ज राश्ट्र नव्हे त्याच्या योग मी तुम्हांला चिडवीन;
20. आणि यषया फार धीट होऊन म्हणतो, जे माझा धावा करीत नसत त्यांस मी प्राप्त झाला; ज्यांनी मजजवळ मागितल नाहीं त्यांस मी प्रकट झाला.
21. इस्त्राएलाविशयीं तो म्हणतोः ‘मीं सारा दिवस आपले हात आज्ञा मोडणा-या व उलटून बोलणा-या लोकांकडे केले आहेत.’
|