1. किंखियांतील मंडळीची सेविका म्हणजे आपली बहीण फीबी इची मी तुम्हांस ओळख करुन देता;
2. यासाठीं कीं तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्य स्वीकार करावा, आणि ज्या कोणत्याहि कामांत तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय् य कराव; कारण ती स्वतः पुश्कळ जणांची व माझीहि साहाय् यकारिणी अशी ठरुन चुकली आहे.
3. खिस्त येशूमध्य माझे सहकारी, प्रिस्क व अक्किला यांस सलाम सांगा;
4. त्यांनी तर माझ्या जिवाकरितां आपला जीव धोक्यांत घातला; त्यांचे आभार केवळ मीच मानिता अस नाहीं, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळîाहि मानितात.
5. जी मंडळी त्यांच्या घरी आहे तिलाहि सलाम सांगा. माझा प्रिय अपैनत ह्याला सलाम सांगा; तो खिस्तासाठीं आसिया देशाच प्रथम फळ आहे.
6. मरीयेस सलाम सांगा; तिन तुम्हांसाठीं फार श्रम केले आहेत.
7. माझे नातलग व सोबतीचे बंदिवान अंद्रोनीक व युनिया यांस सलाम सांगा; ते प्रेशितांमध्य नामांकित आहेत व माझ्यापूर्वीच खिस्तामध्य होते.
8. प्रभूमध्य माझा प्रिय आंप्लियात याला सलाम सांगा.
9. खिस्तामध्य आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु यांस सलाम सांगा,
10. खिस्तामध्य पटलेला अपिल्लेस याला सलाम सांगा. अरिस्तबूलच्या घरांतील माणसांस सलाम सांगा.
11. माझा नातलग हेरोदियोन याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरांतील माणस प्रभूमध्य आहेत त्यांस सलाम सांगा.
12. प्रभूमध्य श्रम करणा-या त्रुफैना व त्रुफोसा यांस सलाम सांगा. प्रिय पर्सिस इला सलाम सांगा; तिन प्रभूमध्य फार श्रम केले.
13. प्रभूमध्य निवडलेला रुफ याला आणि मला मातेसमान अषी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा.
14. असंुक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास यांस व त्यांजबरोबर जे भाऊ आहेत त्यांस सलाम सांगा.
15. फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण, व ओल्लंपास यांस व त्यांजबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांस सलाम सांगा.
16. पवित्र चुंबनान एकमेकांस सलाम करा. खिस्ताच्या सर्व मंडळîा तुम्हांस सलाम सांगतात.
17. आतां बंधुजनहो, मी तुम्हांस विनंति करिता कीं तुम्हांला ज शिक्षण मिळाल आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणार त्यांजवर लक्ष ठेवा; आणि त्यांजपासून दूर असा.
18. कारण तसले लोक आपल्या प्रभु खिस्ताची सेवा करीत नाहींत, तर आपल्या पोटाची करितात; आणि गोड व लाघवी भाशणान भोळîांच्या अंतःकरणास भुलवितात.
19. तुमच आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हांविशयीं मी आनंद मानिता; तरी ज बर आहे त्यासंबंधान तुम्ही शहाण असाव आणि वाइटापासून अलिप्त असावे, अशीं माझी इच्छा आहे.
20. शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखालीं लौकर तुडवील. आपल्या प्रभु येशू खिस्ताची कृपा तुम्हांसह असो.
21. माझा सहकारी तीमथ्य, व माझे नातलग लूक्य यासोन व सोसिपतेर तुम्हांस सलाम सांगतात.
22. ह पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हांस प्रभूमध्य सलाम सांगता.
23. माझ व सर्व मंडळीच अतिथ्य करणारा गायस याचा तुम्हांस सलाम. नगराचा खजीनदार एरास्त व भाऊ क्कर्त ह्यांचा तुम्हांस सलाम.
24. (आपला प्रभु येशू खिस्त याची कृपा तुम्हां सर्वांवर असो. आमेन.)
25. आतां माझ्या सुवार्तेप्रमाण व ज गूज युगानुयुग गुप्त ठेविलेले होत, परंतु आतां प्रकट झाल आहे आणि सर्व राश्ट्रांतील लोकांस त्यांनी विश्वासाधीन व्हाव म्हणून सनातन देवाच्या आज्ञेन संदेश्टयांच्या लेखांच्या द्वारे कळविल आहे, त्या गूजाच्या प्रकटीकरणाप्रमाण, येशू खिस्ताविशयींच्या घोशणेप्रमाण तुम्हांस स्थिर करण्यास समर्थ जो केवळ एकच ज्ञानी देव, त्याला येशू खिस्ताच्या द्वार युगानुयुग गौरव असो. आमेन.
|