1. यास्तव हे मानवा, जो तूं न्यायनिवाडा करतोस तूं कोणीहि असलास तरी तूं निरुत्तर आहेस; ज्याविशयीं तूं दुस-याचा न्याय करितोस त्याचविशयीं तूं स्वतःला अन्यायी ठरवितोस; कारण न्यायनिवाडा देणारा तूं तीच कर्मे करितोस;
2. पण आपल्याला ठाऊक आहे कींं जे अशीं कर्में करितात त्यांजविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार होतो.
3. तर हे मानवा, जो तंू तशीं कर्मे आचरणा-यांचा न्यायनिवाडा करीत असून तींच स्वताः करितोस तो तूं देवाचा न्याय चुकवशील अस तुला वाटत काय?
4. किंवा देवाची दया तुला पश्चाताप करावयास लावणारी आहे ह न समजतां, त्याच दयालुत्व, क्षमा व सहनशीलता हीं विपुल असल्यामुळ त्याचा अवमान करितोस काय?
5. आपला हट्ट व पश्चात्तापहीन अंतःकरण यांस अनुरुप तूं जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रकट होण्याचा दिवस त्या दिवसाचा क्रोध आपणासाठीं साठवून ठेवितोस;
6. ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाण फळ देइ्रल;’
7. धीरान सत्कर्मे करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठीं खटपट करितात त्यांस तो सर्वकालिक जीवन देईल;
8. परंतु जे तट पाडण्णरे आहेत व सत्याला न मानितां अधर्माला मानितात, त्यांजवर क्रोध व कोप, संकट व क्लेश हीं येतील; म्ळणजे दुश्कर्म करणारा मनुश्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, अशा प्रत्येकाच्या जिवावर तीं येतील;
10. पण प्रत्येक सत्कर्म करणारा, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, यांस गौरव, सन्मान व शांति हीं मिळतील;
11. कारण देवाजवळ पक्षपात नाहीं.
12. ज्यांस नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनीं पाप केल तितकेहि नियमशास्त्र नाहीं तरी नाश पावतील; आणि नियमशास्त्र असतां जितक्यांनी पाप केल तितक्यांचा न्याय नियमशास्त्रान होईल;
13. नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृश्टीन नीतिमान् आहेत अस नाहीं, तर नियमशास्त्राप्रमाण आचरण करणारे नीतिमान् ठरतील;
14. ज्यांस नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हां नियमशास्त्रांत आहे त स्वभावतः करितात तेव्हां, त्यांस नियमशास्त्र नाहीं तरी, ते आपणां स्वतःस नियमशास्त्रच आहेच;
15. म्हणजे ते नियमशास्त्रांतील आचार आपल्या अंतःकरणांत लिहिलेला दाखवितात, त्यांच मनहि त्यंास साक्ष देत, आणि त्यांचे एकमेकांविशयींंचे विचार दोश लावणारे किंवा दोशमुक्त करणारे असतात;
16. ज्या दिवशीं देव माझ्या सुवार्तेप्रमाण येशू ख्रिस्ताच्या द्वार मनुश्यांच्या गुप्त गोश्टींचा न्याय करील त्या दिवशीं निर्णय होईल.
17. तुला यहूदी ह नांव आहे; तूं नियमशास्त्राचा आश्रय धरितोस, व देवाविशयीं अभिमान बाळगितोस;
18. तुला त्याची इच्छा कळत; आणि नियमशास्त्राच्या श्रवणान शिक्षण मिळाल्यामुळ ज श्रेश्ठ त पसंत करितोस;
19. नियमशास्त्रांत मला ज्ञानाच व सत्याच स्वरुप मिळाल आहे म्हणून मी अंधळयांचा वाटाडी, जे अंधारांत आहेत त्यांचा प्रकाश,
20. अल्पबुद्धि लोकांचा शिक्षक, बाळकांचा गुरु आह, अशी तुझी खातरी आहे;
21. असा जो तूं दुस-यास शिकवितोस तो तूंच स्वतःला शिकवित नाहींस काय? जो तूं चोरी करितोस काय?
22. जो तूं व्यभिचार करुं नये अस सांगतोस, तो तूंच व्यभिचार करितोस काय? जो तूं मूर्तीचा विटाळ मानितोस, तो तूंच देवळ लुटितोस काय?
23. जो तूं नियमशास्त्राचा अभिमान बाळगितोस, तो तूंच नियमशास्त्राच्या उल्लंघनान देवाचा अपमान करितोस काय?
24. ‘तुम्हांमुळ विदेशी लोकांत देवाच्या नामाची निंदा होत आहे,’ असा शास्त्रलेख आहे.
25. जर तूं नियमशास्त्राप्रमाण करितोस तर सुंतेचा उपयोग आहे; परंतु नियमशास्त्राच उल्लंघन करणारा असलास तर तुझी संुता बेसुंता अशी झाली आहे.
26. तर मग बेसुंती मनुश्यान नियमशास्त्राचे नियम पाळिले, तर त्याची बेसुंता संुता अशी मोजण्यांत येईल कीं नाहीं?
27. शास्त्रलेख व संुता तुझ्या बाजूला असतांना जो तूं नियमशास्त्राच उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो जातीन बेसुंती वर्गातला असून नियमशास्त्र पाळितो, तो करणार नाहीं काय?
28. कारण जो बाहेरुन यहूदी तो यहूदी नव्हे; आणि देहाची जी बाहेरुन होते ती सुंता नव्हे;
29. तर अंतरी जो यहूदी तो यहूदी होय; आणि आध्यात्मिक दृश्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती संुता होय; शास्त्रलेखाप्रमाण व्हावयाची नव्हे; अशाची प्रशंसा मनुश्यापासून नव्हे, तर देवापासून व्हावयाची.
|