1. यास्तव आपण विश्वासान नीतिमान् ठरविलेले आहा म्हणून आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या द्वार आपणांस देवाबरोबर असलेल्या शांतीचा लाभ घडो;
2. ज्या कृपेत आपण आहा तिच्यांत त्याच्याद्वार आपला प्रवेशहि विश्वासान झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळ जयोत्सव करुं.
3. अस केवळ नाहीं, तर संकटांतहि जयोत्सव करुं, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर हा होतो;
4. धीराचा परिणाम कसाला लागण; कसाला लागण्याचा परिणाम आशा;
5. आशा मनोभंग करीत नाहीं; कारण आपणांला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वार आपल्या अंतःकरणांत देवाच्या प्रीतीचा वर्शाव झाला आहे.
6. आपण दुर्बळ होता तेव्हां खिस्त सुसमयीं पापी लोकांसाठी मरण पावला.
7. नीतिमान् मनुश्यासाठीं कोणी मरणारा विरळा, चांगल्या मनुश्यासाठीं मरण्यास कदाचित् कोणी धाडस करील;
8. परंतु देव आपल्यावरच्या स्वप्रेमाच प्रमाण ह देतो की आपण पापी असतां खिस्त आपणांसाठीं मरण पावला.
9. तर आपण जे आतां त्याच्या रक्तान नीतिमान् ठरला आहा ते आपण विशेशकरुन त्याच्या द्वार देवाच्या क्रोधापासून तरले जाऊं.
10. आपण शत्रु असतां देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्युद्वार आपला सेमट झाला, तर आतां समेट झाला असतां त्याच्या जीवनान विशेशकरुन आपण तरले जाऊं;
11. इतकेेच केवळ नाहीं, तर ज्याच्याद्वार समेट ही देणगी आपल्यास आतां मिळाली त्या आपल्या प्रभु येशू खिस्ताच्या द्वार आपण देवाच्या ठायीं जयोत्सव करुं.
12. ह्याप्रकार एका मनुश्याच्याद्वार पाप जगांत आल आणि पापाच्याद्वार मरण आल; आणि सर्वांनी पाप केल्यावरुन सर्व मनुश्यांत मरण पसरल.
13. पाप नियमशास्त्रापूर्वी जगांत होतच; पण नियमशास्त्र नसल म्हणजे पाप मोजण्यांत येत नाहीं.
14. तथापि आदामापासून मोशापर्यंत, ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाण पाप केल नाहीं त्यांजवरहि मरणान राज्य केलं; तो तर, जो येणार होता त्याची प्रतिमा होता.
15. तरी पण जशी अपराधाची गोश्ट तशी कृपादानाची नाहीं; कारण ह्या एकाच्या अपराधान बहुत माणस मरण पावलीं, तर देवाची कृपा आणि तो एक पुरुश येशू खिस्त याच्या कृपेच दान हीं बहुत जणांकरितां विशेशकरुन विपुल झालीं.
16. पाप केलेल्या एका इसमाच्या द्वार जस झाल तस दानाच होत नाहीं; कारण ज्या न्यायाचा परिणाम दंडाज्ञा तो एकावरुन झाला, पण ज्या कृपादानाचा परिणाम नीतिमान् ठरविल जाण असा आहे त बहुत अपराधांवरुन झाल.
17. त्या एकाच्या अपराधान, त्या एकाच्या द्वार, मरणाच राज्य चालू झाल; तर ज्यांस कृपा व नीतिमत्त्वाच दान यांची विपुलता मिळते ते विशेशकरुन त्या एका येशू खिस्ताच्या द्वार जीवनांत राज्य करितील.
18. तर मग जसा एका अपराधान सर्व मनुश्यांवर दंडाज्ञेचा परिणाम झाला, तसा नीतिमान् ठरविल जाण्याच्या एका ठरावान सर्व मनुश्यांवर जीवनदायी नीतिमत्त्व मिळण हा परिणाम झाला.
19. जस त्या एका मनुश्याच्या आज्ञाभंगान बहुत जण पापी ठरले, तस ह्या एकाच्या आज्ञापालनान बहुत जण नीतिमान् ठरतील.
20. शिवाय नियमशास्त्राचा प्रवेश झाला तो अपराध वाढण्यास साधनीभूत झाला; तरी जेथ पाप वाढल तेथ कृपा फारच विपुल झाली;
21. यासाठीं कीं जस पापान मरणच्या योगान राज्य केल, तस कृपेन नीतिमत्त्वाच्या योग सर्वकालच्या जीवनासाठीं येशू खिस्त आपला प्रभु याच्या द्वार राज्य कराव.
|