1. आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहा; म्हणून विनंति करिता कीं तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊं देऊं नये;
2. (कारण तो म्हणतो: प्रसादसमयीं मीं तुझ ऐकल, व उद्धारदिनीं मीं तुला साहाय् य केल; पाहा, आतांच ‘प्रसादसमय;’ पाहा, आतांच ‘तारणाचा दिवस’ आहे;)
3. आमच्या सेवेला दोश लागूं नये म्हणून आम्ही कोणत्याहि प्रकार अडखळण्याच कारण होत नाहीं;
4. तर सर्व गोश्टीत देवाच्या सेवकांप्रमाण आम्ही आपणांस पटविता; फार सहनशीलतेन, संकटांनीं, विपत्तीन, पेचांनीं,
5. फटक्यांनी, बंदिवासांनीं, दंग्यांनीं, कश्टांनीं, जागरणांनीं, उपासांनीं;
6. शुद्धतेन, ज्ञानान, क्षमेन, ममतेन; पवित्र आत्म्यान, निश्कपट प्रीतिन,
7. सत्याच्या वचनान, देवाच्या सामर्थ्यांन; उजवीडावी कडील न्याय् यत्वाच्या शस्त्रास्त्रान,
8. गौरवान व अपमानान, अपकीर्तिन व सत्कीर्तीन, आम्ही आपली लायकी पटविता; आम्ही फसविणारे मानिलेले तरी खरे;
9. अप्रसिद्ध मानिलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानिलेले तरी पाहा, ‘आम्ही जीवंत आहा;’ ‘शिक्षा भोगणारे’ अस मानिलेले ‘तरी जिव मारलेले नाहीं;’
10. दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे’ दरिद्री मानिलेले तरी बहुतांस सधन करणारे; कफल्लक असे मानिलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटविता.
11. आहो करिंथकरांना, तुम्हांबरोबर बोलण्यास आमच ताड मोकळ झाल आहे, आमच ‘अंतःकरण विस्तीर्ण आहे.’
12. तुम्हांविशयीं आमच अंतःकरण संकुचित नाहीं, तुमचींच अंतःकरण संकुचित आहेत.
13. तर तुम्हीहि आमची फेड करण्यासाठीं आपली अंतःकरण तशींच विस्तीर्ण करा, ह मी तुम्हांस आपलीं मुल अस समजून सांगता.
14. तुम्ही विश्वास न ठेवणा-यांबरोबर जडून विजोड होऊं नका; कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार?
15. खिस्ताच बलियालाबरोबर कस ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार?
16. देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहा; देवान अस म्हटल आहे कीं ‘मी त्यंा निवास करीन व चालेन; मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’
17. यास्तव त्यांतून निघा व वेगळे व्हा, अस प्रभु म्हणतो; आणि अशुद्ध वस्तूला शिवूं नका; म्हणजे मी तुम्हांस स्वीकारीन;
18. आणि मी तुम्हांस पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशीं व्हाल, अस सर्वसत्ताधारी प्रभु म्हणतो.
|