1. यास्तव आपण खिस्ताविशयींच्या मूळारंभींच्या गोश्टी सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटान प्रयत्न करुं; निर्जीव कर्मांचा पश्चाताप, देवावरचा विश्वास,
2. आणि बाप्त्स्म्यिांच, हात वर ठेवण्याच, मृतांच्या पुनरुत्थानाच व सार्वकालिक न्यायाच शिक्षण, हा पाया आपण पुनः घालूं नय.
3. देव होऊं देईल तर ह आपण करुं.
4. कारण जे एकदां प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुचि घेतली, जे पवित्र आत्म्याचे वांटेकरी झाले,
5. आणि ज्यांनीं देवाच्या सुवचनाची व येणा-या युगाच्या सामर्थ्याची रुचि घेतली,
6. ते जर पतित झाले तर त्यांस पश्चाताप होईल अस पुनः नवीन करण अशक्य आहे; ह त्यांचे पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्यान वधस्तंभावर खिळण व त्याचा उघड अपमान करण अस आहे.
7. कारण जी ‘भूमि’ आपणावर वारंवार पडलेला पाऊस पिऊन आपली लागवड करणा-यांस उपयोगी अशी ‘हिरवळ’ उपजविते; तिला देवाचा आशिर्वाद मिळतो;
8. आणि जी भूमि ‘कांटेझाड व कुसळ उपजविते,’ ती टाकाऊ व शापित होण्याच्या लागास आलेली आहे; तिचा शेवट जळणे हा आहे.
9. जरी आम्ही अस बोलता तरी, प्रिय बंधूंनो, तुमची स्थिति ह्यापेक्षां चांगली व तारणाकडे नेणारी आहे असा आम्हांस तुम्हांविशयीं भरवसा आहे,
10. कारण तुमच कार्य आणि तुम्हीं पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा, यावरुन जी प्रीति तुम्हीं त्याच्या नामावर दाखविली तीहि देवान विसरावी असा तो अन्यायी नाहीं.
11. आमची अशी उत्कंठा आहे कीं तुम्हांपैकीं प्रत्येकान आशेची पूर्ण खातरी करुन घेण्यासाठीं तशीच आस्था शेवटपर्यंत बाळगावी;
12. म्हणजे तुम्ही आळशी होणार नाहीं, तर जे विश्वासान व धीरान वचनांचीं फळ वारशान उपभोगणारे होतात त्यांचे अनुकारी व्हाल.
13. देवान अब्राहामाला वचन दिल, तेव्हां त्याला शपथ वाहण्यास स्वतःपेक्षा कोणी मोठा नसल्यामुळ, त्यान ‘आपलीच शपथ वाहून’ म्हटल कीं
14. ‘मी तुला आशीर्वाद देईनच देईन, व तुझ संतान वाढवीनच वाढवीन.’
15. त्यान धीरान वाट पाहिली म्हणून त्याला ह्याप्रमाणे वचनाच फळ प्राप्त झाल;
16. मनुश्य आपणांपेक्षां मोठ्याची शपथ वाहतात; आणि आपलें स्थापित करण्यासाठीं शपथ ही त्याच्यामध्य सर्व वादांचा शेवट आहे.
17. यास्तव आपल्या संकल्पाची निर्विकारता वचनाच्या वतनदारांस विशेश दाखवावी या इच्छेन देव शपथेच्या द्वार मध्यें आला,
18. यासाठीं कीं ज्यांविशयीं खोट बोलण देवाला अशक्य आहे अशा दोन निर्विकार गोश्टींनीं आपल्याला चांगले उत्तेजन याव; ते आपण, स्वतःपुढ ठेवण्यांत आलेली आशा धरुन ठेवण्याकरितां आश्रयास धावला.
19. ती आषा आपल्याला जिवांचा नांगर आहे. तो अचल, बळकट व ‘पडद्याच्या आंतल्या स्थळीं पोहंचणारा’ असा आहे;
20. ‘तेथ मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाण युगानुयुगाचा’ प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरितां आंत गेला आहे.
|